साखर कारखान्याचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला जाईल: हरवीर सिंह

बाजपूर : सहकार क्षेत्रातील बाजपूर सहकारी साखर कारखान्याचा इतिहास गौरवशाली आहे. त्याच्या माध्यमातून या क्षेत्रातील समृद्धीचा अनुभव येतो. कारखान्याचा गौरवशाली इतिहास जपण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन कारखान्याचे नूतन मुख्य व्यवस्थापक हरवीर सिंह यांनी केले. सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवानातील आपल्या कार्यालयात काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी नव्या नियुक्तीबाबत त्यांचे स्वागत केले. कारखान्याशी संबंधीत आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. काही बाबत सुधारणा गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांशी चर्चा करताना मुख्य व्यवस्थापक हरवीर सिंह यांनी सांगितले की, कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. याच अनुषंगाने त्यांनी २२ जुलै रोजी कारखान्यातील तांत्रिक आणि प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या वेळी भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष कर्म सिंह पड्डा, विभागीय अध्यक्ष प्रताप सिंह संधू, बिजेंद्र सिंह डोगरा, जसवंत सिंह, बलदेव सिंह, आय. पी. बरार, बल्ली सिंह चीमा आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here