साखर उत्पादनात इजिप्त ८७ टक्के आत्मनिर्भर

कैरो : इजिप्तने गेल्या वर्षी साखर उत्पादनात जवळपास ८७ टक्के आत्मनिर्भरता मिळवली आहे असे प्रतिपादन इजिप्तचे पुरवठा मंत्री मोहम्मद मोसेल्ही यांनी सांगितले. साखर साठवणुकीच्या रणनीतीनुसार तीन महिने पुरेसा साठा आहे असे ते म्हणाले. इजिप्त आता आपल्या गरजेच्या केवळ १२ टक्के साखर आयात करतो. सरकारकडून सुरू केलेल्या सर्व उपाययोजनांचा उद्देश नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा आणि त्यांचा त्रास कमी कणे हाच आहे असे मंत्री मोसेल्ही म्हणाले.

ते म्हणाले, देशातील सर्वात कमकुवत वर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्यांना अनुदानाची गरज नाही अशा लोकांची नावे रेशन कार्डातून वगळण्यात येत आहेत. आम्ही सर्व संबंधीत मंत्रालयांची मदत घेत आहोत. त्यातून गरजू लोकांना अनुदान पोहोचेल असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here