इजिप्तला 1,00,000 टन कच्च्या साखरेच्या निविदेला मिळाली ऑफर

234

हॅम्बर्ग : इजिप्तची प्रमुख साखर खरेदीदार संस्था ईएसआयआयसीद्वारे शनिवारी बंद करण्यात आलेल्या 1 लाख टन कच्च्या साखरेच्या खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदेता ऑफर मिळाली आहे. या निवेदांमध्ये सर्वात कमी किंमतीची 462.99 टन सीअँडएफ असल्याचे सांगण्यात येत आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसारीत केले आहे.

दरम्यान, निविदेसाठी मिळालेल्या या ऑफरवर अद्याप विचार केला जात आहे. अधिकृतरित्या खरेदीबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

ईएसआयआयसीने या साखरेपैकी 50,000 टनाच्या पहिल्या शिपमेंटसाठी 5 ते 15 जुलै आणि दुसर्‍या शिपमेंटसाठी 15 ते 25 ऑगस्ट असा कालावधी निश्चित केला आहे. इजिप्तने अलिकडेच 2021 अखेरपर्यंत साखर उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here