इजिप्तकडे ६ महिन्यांसाठी पुरेसा साखर साठा : पुरवठा मंत्री मेसेल्ही

कैरो : साखरेचा धोरणात्मक साठा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आला आहे, अशी माहिती इजिप्तचे पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली अल-मेसेल्ही यांनी सांगितले. ते म्हणाले की स्थानिक बीट आणि ऊस पिकापासून होणारे साखरेचे उत्पादन देशाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी साखरेचा धोरणात्मक साठा वाढवेल. सर्व खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे मेसेल्ही यांनी सांगितले. ते म्हणाले की, साखर कारखानदार हंगाम संपेपर्यंत बीट पीक शेतकऱ्यांकडून घेत राहतील आणि त्यांची थकबाकी तातडीने दिली जाईल.

स्थानिक नागरिकांना साखर ग्राहक केंद्रात किंवा शिधापत्रिकेवर तसेच बाजारपेठेत नियमितपणे उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डेल्टा शुगर कंपनीने साखर बीट पिकापासून साखरेचे उत्पादन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. डेल्टा शुगर कंपनीचे प्रमुख अहमद अबुल-याझिद म्हणाले की, बीटपासून साखरेचे उत्पादन करण्यासाठी, शेतकरी बीट पीक घेतात आणि बीटपासून आतापर्यंत सुमारे १० लाख टन साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. सुमारे १,४०,००० टन पांढरी साखर मोठ्या प्रमाणात तयार केली गेली आहे. तसेच ५०,००० टन मोलॅसिस आणि ५८,००० टन बीट पल्पचे उत्पादन करण्यात आले आहे, जे खाद्य उद्योगात वापरले जाते, असे ते म्हणाले. अबुल यदीज यांनी सांगितले की, पुरवठा मंत्री नियमित बीट पिकाचा पुरवठा करण्याच्या नियमांचे पालन करीत आहेत. डेल्टा शुगर कंपनी बिटपासून साखर निर्मितीच्या उद्योगातील एक सर्वात मोठी राष्ट्रीय कंपनी आहे, जी बिटच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here