इजिप्तकडे सहा महिन्यांसाठी पुरेसा साखर साठा उपलब्ध

कैरो : इजिप्तकडे आगामी सहा महिन्याच्या मागणीइतका पुरेसा साखरसाठा उपलब्ध आहे असे अंतर्गत व्यापार विकास प्राधिकरणाचे प्रमुख इब्राहिम अश्मावी यांनी सांगितले. इजिप्तकडे खाद्यतेलाचा आगामी पाच महिन्यांसाठीचा साठा उपलब्ध असून तांदळाचा साठा साडेतीन महिन्यांसाठी पुरेसा ठरू शकेल.

इजिप्तच्या कृषी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इजिप्तमध्ये चालू हंगामात २.८५ मिलियन टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. देशाच्या ९० टक्के मागणीची पूर्तता त्यामधून होऊ शकेल. शुगर क्रॉप काऊन्सिलचे प्रमुख मुस्तफा अब्देल गवाद यांनी सांगितले की, इजिप्तला यंदाच्या हंगामात किरकोळ प्रमाणात साखरेची आयात करण्याची गरज भासू शकेल. उर्वरीत देशांतर्गत मागणी पुर्ण करण्यासाठीचा साखरसाठा सध्या उपलब्ध आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here