इजिप्त: स्थानिक साखर उत्पादन वाढल्याने आयातीमध्ये घट

कैरो : यावर्षी ऊस उत्पादन करणाऱ्या क्षेत्रामधील साखर उत्पादन ७५ टक्क्यांवरुन वाढून ८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. परिणामी आयात घटविण्यात यश आले आहे, अशी माहिती पुरवठा आणि अंतर्गत मंत्री अली एल मेसेल्ही यांनी दिली. ते म्हणाले, राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी २०१४ मध्ये आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर पुढील सात वर्षांमध्ये त्यांनी खूप काही बदल घडवले आहेत. यापूर्वी कोणालाही अशी प्रगती करणे शक्य झालेली नाही.

ते म्हणाले, देशाने ठरवलेल्या धोरणानुसार यावर्षी गव्हाच्या आयातीमध्ये १३ टक्क्यांची कपात झाली आहे. देशात पुढील सहा महिन्यांसाठी गव्हाचा पुरेसा साठा आहे. तांदुळाचे वितरण आणि नव्या राईस मिलच्या स्थापनेसाठी पूर्वापार असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तांदूळ उत्पादनातही आत्मनिर्भरता आली आहे. मंत्रालयाकडे पाच महिन्यांसाठीचा पुरेसा साखर साठा आहे असे मंत्री अली एल. मेसेल्ही यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here