इजिप्तमध्ये इथेनॉल प्रोजेक्ट्ससाठी Praj आणि ESIIC एकत्र

नवी दिल्ली : Praj Industries Limited (Praj) ने मंगळवारी Egyptian Sugar and Integrated Industries Company (ESIIC) सोबत एका सामंजस्य कराराची (एमओयू) घोषणा केली आहे. या सामंजस्य कराराचा हिस्सा म्हणून प्राज आणि ESIIC पायाभूत सुविधांचा विकास करतील. तसेच धोरणात्मक तयारीसाठी मदत करतील. आणि इजिप्तमध्ये मुख्यत्वे जैव अर्थव्यवस्थेप्रती जागरुकता केली जाईल.

याबाबत प्राज इंडस्ट्रिजने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतातील सर्वात कुशल औद्योगिक बायोटेक कंपनी प्राज आणि इजिप्तमधील साखर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ESIIC हे दोघेही इजिप्तमधील पहिली आणि दुसऱ्या टप्प्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. इजिप्तच्या पहिल्या आणि दुसऱ्या जनरेशनमधील इथेनॉल योजनेसाठी उसाचा बगॅस (Sugarcane bagasse) आणि rice straw चा फीडस्टॉकच्या रुपात वापर केला जाईल.

या २ जी इथेनॉल प्लांटपासून उत्पादित कमी कार्बन इथेनॉलचा पुरवठा विशेष रसायनाच्या उत्पादनासाठी फिडस्टॉकच्या रुपात केला जाईल. हे स्थायी जैव रसायन जीवाश्म मार्गांपासून मिळवलेल्या रसायनांवरील अवलंबित्व कमी करेल.
ESIIC चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक Essam El-Din EI-Bedewy यांनी सांगितले ती, २ जी इथेनॉल क्षेत्रात प्राजच्या कुशलतेा फायदा निश्चित रुपात इजिप्तला फलदायी ठरेल. ते म्हणाले की, आम्ही एक जागतिक अग्रणी औद्योगिक कंपनी प्राजसोबत एमओयू करून खूप खुश आहोत. आम्हाला विश्वास आहे की ही भागिदारी इजिप्तला जैव अर्थव्यवस्थेमध्ये आणखी उंचावून जाण्यास मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here