इजिप्तचा 2024 मध्ये 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय

कैरो : इजिप्त सरकारने स्थानिक बाजारपेठेतील कमतरता भरून काढण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2024 मध्ये 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी  खाद्य वस्तू पुरवठा प्राधिकरणाने (GASC) डिसेंबरमध्ये 50,000 टन साखर आयात करण्यासाठी पावले उचलली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये डिलिव्हरी शेड्यूल होते.

स्थानिक साखरेच्या वाढत्या किमतींचा भार कमी करण्याच्या प्रयत्नात, इजिप्तच्या पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयाने जास्तीत जास्त तीन व्यक्ती असलेल्या कुटुंब शिधापत्रिकेवर प्रति व्यक्ती एक किलो अतिरिक्त साखर देण्याची घोषणा केली. शिवाय, चार किंवा अधिक व्यक्तींच्या कुटुंबांना त्यांच्या शिधापत्रिकेवर दोन किलो अतिरिक्त साखर मिळणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here