EID Parry ने लॉन्च केले ‘हँडक्लीन’हँड सॅनिटायझर

227

चेन्नई : मुरुगप्पा ग्रुप ची कंपनी ईआईडी पेरी (इंडिया) ने रिटेल सेगमेंट साठी एक हाई-एंड हॉस्पिटल-ग्रेड हँड सॅनिटायझर ‘हँडक्लीन’ लॉन्च केला आहे. ‘हँडक्लीन’ हँड सॅनिटायझर ला कंपनी च्या सध्याच्या रिटेल नेटवर्क च्या माध्यमातून दक्षिण आणि पूर्ण देशामध्ये ई-कॉमर्स चॅनल्स च्या माध्यमातून विकण्याची योजना बनवली गेली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, हे 50ml, 100ml, 200ml आणि 500ml च्या रिटेल पॅक मध्ये उपलब्ध होईल. कंपनीची प्रत्येक महिन्यात 4.5 लाख लीटर उत्पादन क्षमता आहे.

कंपनी च्या मतानुसार,हँड सॅनिटायझर उच्च श्रेणीचे आहे, जे तीन दक्षिणी राज्य – तमिलनाडु, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये एकीकृत साखर प्लांटसमध्ये उत्पादित होते. ईआईडी पेरी दक्षिण भारतामध्ये इथेनॉल च्या सर्वात मोठया उत्पाादकांपैकी एक आहे. कोरोना वायरस महामारी दरम्यान कंपनी कडून आजपर्यत, दक्षिण भारतामध्ये औद्योगिक उपयोगकर्त्यासाठी 1 लाख लीटर सॅनिटायझर ची विक्री झाली आहे. ‘हँडक्लीन’ चे उत्पादन डीसीए (ड्रग्स कंट्रोल एडमिनिस्ट्रेशन) चे मानदंड आणि डब्ल्यूएचओ च्या नियमानुसार केले जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here