‘पेर्री इंडिया’चा पाँडिचेरीतील साखर कारखाना बंद

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

चेन्नई : चीनी मंडी

साखर उत्पादनातील नामवंत कंपन्यांपैकी एक असलेल्या ईआयडी पेर्री इंडिया लिमिटेड या कंपनीने आपला एक कारखाना थेट बंद करण्याचा निर्णय घेतल आहे. कंपनीने पाँडिचेरीतील आपले युनिट बंद करण्याचे ठरविले आहे. सातत्याने गाळपसाठी उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात कंपनीकडून देण्यात आल्याने निवेदनात म्हटले आहे की, यापुढे कारखाना परिसरात सातत्याने ऊस उत्पादनात घट होत आहे. यासह इतर कारणांनी कंपनीचे युनिट बंद करण्यात येत आहे. पाँडिचेरीतील बंद करण्यात येत असलेल्या कारखान्यातील काही मालमत्ता इतर युनिटमध्ये नेण्यात येणार आहे.

कंपनीच्या वाटचाली संदर्भात व्यवस्थापकीय संचालक एस. सुरेश म्हणाले, ‘साखरेच्या किमतींचा परिणाम कंपनीच्या परफॉर्मन्सवर होताना दिसत आहे. त्याचबरोबर रिलिज ऑर्डर मॅकॅनिझमही परिणाम करत आहे. गेल्या हंगामातील पहिल्या तिमाहीमध्ये झालेल्या गाळपाच्या तुलनेत यंदा गाळप कमी झाले आहे. असे असले तरी यंदाचे एकूण गाळप सामान्यच राहिल अशी स्थिती आहे. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने १ लाख ४१ हजार ४०० टन साखर निर्यात केली आहे. तसेच कंपनीनेने बी ग्रेड मळीपासून पहिल्यांदाच इथेनॉल उत्पादन सुरू केले आहे. तसेच हलियाल येथे कंपनीने एक रिफायनरी प्रकल्प सुरू केला आहे.’

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here