ईआयडी पेरी आंध्र प्रदेशात डिस्टिलरी प्लांट सुरू करणार

ईआयडी पेरी इंडिया लिमिटेडने आपल्या सांकिल युनिटमध्ये १२० किलो लिटर क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने भारतीय शेअर बाजारात नियामकांकडे केलेल्या फायलिंगमध्ये सांगितले की मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाने ९२.५ कोटी रुपयांच्या युनिटला मंजुरी दिली आहे. यासाठी गुंतवणूक करताना येणारा खर्च उधारीच्या माध्यमातून केला जाणार आहे ‌

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याची घोषणा केली आहे. ईआयडी पेरी कंपनीने सांगितले की, कंपनी इथेनॉल उत्पादन करण्यासाठी आपल्या योजनेतून सद्यस्थितीतील संधीचा फायदा घेणार आहे. प्रस्तावित डिस्टिलरी गळीत हंगामाच्या दरम्यान उसाचा रस अथवा शिरा मुख्य फीडस्टॉक म्हणून वापरेल. कंपनीने सांगितले की हंगाम नसताना खराब तांदूळ आणि मक्का यांसारख्या धान्याचा वापर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here