एल निनो इफेक्ट : 2023 मध्ये भारतात पावसाने पाच वर्षांची निचांकी पातळी गाठली

नवी दिल्ली : यंदा एल निनोमुळे भारतात मान्सूनचा पाऊस 2018 नंतरचा सर्वात कमी पाऊस होता. इतकेच नाही तर एल निनोमुळे ऑगस्ट महिना शतकातील सर्वात कोरडा महिना ठरल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. भारताच्या 3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मान्सून खूपच महत्त्वपूर्ण आहे. सुमारे 70 पिके आणि जलाशय आणि जलसाठे भरून काढण्यासाठी देशाला पावसाची गरज आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातील जवळपास निम्म्या शेतजमिनीमध्ये सिंचनाचा अभाव आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कृषी उत्पादनासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. कमी पाऊस पडल्याने साखर, डाळी, तांदूळ आणि भाज्या या प्रमुख अन्नपदार्थांच्या कमतरतेमुळे म्हगैच्या झळा बसण्याची शक्यता असते. भारतात पावसाअभावी तांदूळ, गहू आणि साखर उत्पादन कमी होऊ शकते. ज्यामुळे या अन्नपदार्थांच्या निर्यातीवर अधिक निर्बंध येऊ शकतात.

जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरातील पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 94% होता, जो 2018 नंतरचा सर्वात कमी आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) एका निवेदनात म्हटले आहे. या हंगामासाठी पावसाची तूट 4% वर्तवण्यात आली होती. IMD ने म्हटले आहे की, ऑगस्ट हा विक्रमी कोरडा होता, ज्यात 13% पावसाची कमतरता होती, परंतु सप्टेंबरमध्ये पाऊस परतला आणि देशात सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

मान्सूनच्या पावसाच्या अनियमित वितरणामुळे जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश असलेल्या भारताने तांदूळ निर्यातीला निर्बंध घालणे, कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावणे, डाळींच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी देणे आदी उपाययोजना कराव्या लागल्या. हवामान खात्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here