एल निनोने वाढवली सरकारची चिंता? महागाई परतण्याची शक्यता

नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर गेल्या काही दिवसांपासून सरकारला चांगली स्थिती दिसून येत होती. मात्र, एल निनोमुळे महागाईचा राक्षस परत येऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. कारण यामुळे पावसावर परिणाम होऊ शकतो. दुष्काळाची स्थितीही उद्भवू शकते असे सांगण्यात येत आहे.

मे महिन्यात रिटेल महागाई घटून ४.२५ टक्क्यांवर आली. तर घाऊक महागाई कमी होऊन -३.४८ टक्क्यांच्या निम्न स्तरावर पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारातील दिग्गजांनी महागाई कमी होवून कर्जे स्वस्त होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जून महिन्यातील आरबीआयच्या पतधोरण बैठकीत सलग दुसऱ्यांना दर स्थिर राहिले. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार महागाईबाबत अद्यापही चिंताजनक स्थिती आहे. महागाईचा दर अद्यापही ४ टक्क्यांच्या वर आहे. तो आणखी वाढू शकतो. इस्माने यापुर्वीच आगामी हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here