कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष राहुल खाडे यांची निवड

कोल्हापूर :येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहुल विश्वनाथ ऊर्फ बाजीनाथ खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कारखाना कार्यस्थळावर सभागृहामध्ये प्रादेशिक उपसंचालक(साखर) कोल्हापूरचे प्राधिकृत अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा झाली.कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.विश्वासराव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड झाली.

सभेत अनिष पाटील यांनी खाडे यांचे नाव सुचवले.अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर माजी आ.चंद्रदीप नरके म्हणाले, भविष्यात सभासदांच्या मागणीनुसार कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचा मानस आहे. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. नूतन उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी अध्यक्ष नरके व संचालक मंडळाचे आभार मानले.संचालक ॲड. बाजीराव शेलार, विलास पाटील, प्रकाश पाटील, कामगार प्रतिनिधी दीपक चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. विजय पाटील, दिगंबर पाटील, संचालक विश्वास पाटील, उत्तम वरूटे, अनिल पाटील, दादासो लाड, किशोर पाटील, भगवंत पाटील, सर्जेराव हुजरे, संजय पाटील, सरदार पाटील, बळवंत पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here