कोल्हापूर : जिल्ह्यातील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कारखान्यासाठी २१ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. २२ मे २०२३ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर मंडलिक गटाचीच सत्ता आहे. सध्या या कारखान्याचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक हे करीत आहेत. बोरवडे, मुरगूड, मौजे सांगाव, सेनापती कापशी आणि कागल अशा पाच गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडून द्यायचे आहेत. तर उर्वरित संचालक संस्था गट व अनुसूचित जाती – जमाती गट, भटक्या विमुक्त आणि इतर मागास प्रवर्ग अशा चार गटातून प्रत्येकी एक आणि दोन महिला संचालक निवडले जाणार आहेत.
कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम असा…
२२ ते २६ मे २०२३ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. २९ मे रोजी २०२३ रोजी उमेदवारांची छाननी होणार असून ३० मे ते १३ जून २०२३ पर्यंत अर्ज माघारी प्रक्रिया सुरु राहणार आहे. १४ जून २०२३ रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २५ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होणार आहे. २७ जून २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कागल – राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे हे काम पाहणार आहेत.