कर्नाटकमध्ये निवडणुकीची घोषणा, १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी निकाल

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा बुधवारी करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, दक्षिण भारतातील या राज्यात एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होईल. त्याची मतमोजणी १३ मे रोजी केली जाईल. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निवडणूक होणार आहे. सत्तारुढ भाजप, काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांनी विजयाचा दावा केला आहे. ही लढत तिरंगी होईल अशी शक्यता आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कर्नाटकमध्ये एकूण ५.२१ कोटी मतदार आहेत. यापैकी २.६२ कोटी पुरुष तर २.५९ कोटी महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची मुभा दिली आहे. कर्नाटकमध्ये एससी-एसटी समाजाची मते २४.५ टक्के आहेत. तर १६ टक्के मुस्लिम मतदार आहेत. राज्यात लिंगायत मतदार १४ टक्के असून वोक्कलिंग मतदार ११ टक्के आहेत. राज्यातील एकूण २२५ जागांपैकी ३६ जागा दलित, १५ जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. तर १७३ जागा खुल्या आहेत. २०१८ मधील निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसची आघाडी सत्तेवर आली होती. त्यानंतर भाजपने बंडखोर आमदारांचे समर्थन मिळवले. विधानसभेत भाजप आमदारांची संख्या १२१ असून काँग्रेसचे ७० आमदार आहेत. जेडीएसकडे ३० आमदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here