साखर कारखान्यांकडून ३५ कोटी रुपयांच्या विजेची विक्री

मुझफ्फरनगर : ऊस गाळपात अव्वल राहिलेल्या खतौलीच्या त्रिवेणी साखर कारखान्याने राज्य सरकारला ३५ कोटी रुपयांच्या विजेची विक्री केली आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने साडेनऊशे कोटी युनिट विजेचे उत्पादन केले. विजेच्या विक्रीसनंतरही कारखान्याला पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे कारखान्याने राज्य सरकारकडे गाऱ्हाणे मांडले आहे. कारखान्याने ऊस बिलांतील ९४ टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केले आहेत.

खतौली कारखान्याने गळीत हंगामात विजेचे उत्पादन केले. कारखान्यातील बॉयलरच्या माध्यमातून स्टीमपासून विजेची निर्मिती होते. साखर कारखाना आणि राज्य सरकारमध्ये या विज खरेदीबाबत करार झाला आहे. कारखान्याने २८ ऑक्टोबर ते २१ मे या कालावधीत गळीत हंगाम चालवला. या २४० दिवसांच्या काळात कारखान्याने ९.५० कोटी युनिट वीज निर्मिती केली. ही वीज बुढाणा रोडवरील विजगृहाला पुरविण्यात आली. राज्य सरकारने ३.२० रुपये प्रती युनिट दराने ही वीज खरेदी केली.

कारखान्याने ३५ कोटी रुपयांची वीज निर्मिती केली होती. डिसेंबर २०२० मध्ये सरकारने सात कोटी रुपये कारखान्याला दिले. अद्याप कारखान्याचे २८ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांकडून ७६० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला. त्यापैकी ७२० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. उर्वरीत पैसे देण्यासाठी कारखान्याला विजेच्या पैशांची गरज आहे. सरकारला आम्ही ३५ कोटी रुपयांची वीज विक्री केली आहे. त्यापैकी ७ कोटी रुपये मिळाले आहेत. लवकरच उर्वरीत पैसे मिळतील अशी अपेक्षा असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी सांगितले. तर राज्य सरकार थेट वीज खरेदी करते. त्याचा ऊस विभागाशी संपर्क येत नाही असे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here