कोरोना कालावधीत ऊस उत्पादनांच्या अडचणी दूर करा: जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

141

बागपत : कोरोना संक्रमण वाढल्याने ऊस खरेदी केंद्रांवर ऊस खरेदी न होणे अथवा शेतकऱ्यांशी संबंधित अन्य समस्या वाढल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर साखर कारखान्यांचे व्यवस्थापन आणि ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी राजकमल यादव यांनी झूमवरून बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याविषयी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांना कोरोना कर्फ्यू अथवा इतर कोणत्याही कामांच्या अडचणी येऊ देऊ नका. त्यांच्या तोडणी पावत्या अथवा इतर कोणत्याही समस्यांची सोडवणूक गतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी, मेरठ विभागाचे ऊस उप आयुक्त यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात. ऊस खरेदी केंद्रावर काही अडचणी आल्या तर शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा. शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बागपत शुगर मिल, रमाला शुगर मिल, मलकपूर शुगर मिल, मोदीनगर शुगर मिल, किनौनी शुगर मिलसह सर्व कारखान्यांचे सर व्यवस्थापक, विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा. त्यासाठी मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here