शेतकरी संवादमध्ये पंतप्रधानांकडून नैसर्गिक शेतीवर जोर

गोड्डा : कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात नैसर्गिक शेतीविषयी जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शैतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक उपोययोजना केल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मत्स्यपालन, पशुपालनासोबत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसोबत स्वतःला जोडून घ्यावे आणि लाभ घ्यावा असे सांगितले. तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जैविक शेतीबाबतचे आपले अनुभव मांडले. शेतीसोबत पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्य पालन आणि सौर ऊर्जा, बायो फ्यूएफ यांसारख्या पर्यायांतून शेतकरी समृद्ध होऊ शकतात असे ते म्हणाले. गावांत साठवणूक केंद्रे, कोल्ड स्टोअरेज, फूड प्रोसेसिंगसाठी कोट्यवधींची तरतुद केली आहे. बियाण्यापासून बाजारापर्यंत, माती तपासणीबाबत सरकार गंभीर आहे असे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान केव्हीकेच्या सभागृहात कृषी वैज्ञानिक डॉ. रविशंकर यांनी मार्गदर्शन केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश झा यांनी पदाधिकारी, कृषी वैज्ञानिक, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. जिल्हा कृषी अधिकारी डॉ. रमेश चंद्र सिन्हा, आत्माचे राकेश कुमार सिंह, जिल्हा उद्यान अधिकारी सत्य नारायण महातो, जिल्हा पशूपालन अधिकारी डॉ. प्रवीण कुमार, इफकोचे एरिया मॅनेजर विजय कुमार गुप्ता, पवन झा, डॉ. सतीश कुमार, डॉ. सूर्यभूषण, प्रगतिका मिश्रा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here