घोसी साखर कारखान्याचे कर्मचारी १० महिने पगाराविना

मऊ: घोसी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या १० महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. हा प्रश्न आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचला आहे. लवकरच मुख्यमंत्री यावर काही निर्णय घेतील अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील खासदार सकलदीप राजभर यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या कामगार नेते शिवकांत मिश्र यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. फेब्रुवारी २०२० पासून या कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय जे कामगार २०१६ मध्ये निवृत्त झाले आहेत, त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अद्याप कामगार अथवा कुटुंबीयांना मिळालेली नाही. त्यामुळे निवृत्त कामगार आणि कुटूंबांची परिस्थिती हालाखीची आहे. शिवकांत मिश्र, जमानत अब्बास, जयराम चैरसिया, राणा प्रताप सिंह, जयहिंद राजभर, नागेंद्र पांडे, कृष्णचंद पांडे, के. एल. ओझा, लक्ष्मण मिश्रा, आफताब अहमद, शभुंनाथ चैरसिया, सुरेश यादव, भागीरथ मौर्य आदींनी यावेळी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here