सह्याद्री कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतली औद्यौगिक सुरक्षेची शपथ

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळयासमोर कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी सर्वांना ही शपथ दिली.

५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून, राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वतःला पूर्ण वाहून घेवून आमच्या स्वतःच्या, कुटूंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व आपल्या देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे व सूचनांचे पालन करू व आपल्या कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here