नगिना : बुंदकी-नगीना ऊस विकास परिषदेतर्फे रामपूरदास ऊर्फ पाटपाडा गावात शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना लाल सड रोगाने बाधित ०२३८ या प्रजातीचा वाण सोडून इतर नवीन ऊसाच्या वाणांचा वापर करण्याबद्दल प्रोत्साहन देण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक अविनाश चंद्र तिवारी म्हणाले की, लाल सड रोगाला उसाचा कर्करोग असेही म्हणतात. या रोगाचा उसाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत आहे. ऊस पिकाची नासाडी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित वाण ०११८, १३२३५, १४२०१, १३२३१, १७२३१, ९८०१४ आणि १५०२३ यांची लागवड करावी.
ऊस लागवडीवेळी बियाण्यावर प्रक्रिया करावी. माती शुद्ध करण्यासाठी ट्रायकोडर्मा वापरावा असे त्यांनी सांगितले. ऊस विकास परिषदेमार्फत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रजातींचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे असे ते म्हणाले. यावेळी ऊस पर्यवेक्षक परवीन सिंग, अनिल कुमार आदींनीही चर्चासत्रात माहिती दिली.