सातारा जिल्ह्यात गळीत हंगामाची समाप्ती, १ कोटी ११ लाख मे. टन ऊस गाळप

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व १७ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. जिल्ह्यात १ कोटी ११ लाख ५५ हजार ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापासून १ कोटी ९ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. गाळपात जरंडेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली तर अजिंक्यतारा साखर कारखाना १२.४५ टक्के साखर उताऱ्यासह जिल्ह्यात सर्वात पुढे आहे. त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याला १२.२२ टक्के उतारा मिळाला आहे.

सर्वाधिक १८ लाख ६० हजार २०० टन ऊस गाळपाद्वारे १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती करून जरंडेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. यंदा उसाचे प्रमाण कमी असल्याने साखर कारखाने पाच महिने चालले आहेत. पहिल्यांदाच एप्रिलमध्ये साखर कारखाने बंद झाले आहेत. खासगी कारखान्यांनी ५१ लाख ४७ हजार क्विंटल, तर सहकारी साखर कारखान्यांनी ५८ लाख २८ हजार ६१० साखरेची निर्मिती केली आहे. यंदा पाणीटंचाई व उसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही जिल्ह्यात साखर निर्मितीत कारखान्यांनी कोटीची उड्डाणे घेतली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here