साओ पाउलो : युक्रेनमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी युरोपकडून स्वस्त ब्राझिलियन इथेनॉलची खरेदी केली जात आहे. त्यामुळे या देशांची आयात तिप्पट झाली आहे. ब्लुमबर्गमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युरोपमध्ये नैसर्गिक गॅस व विजेचे दर इतके वाढले आहेत, की काही इथेनॉल निर्मात्यांनी प्लांट बंद करण्याचाही विचार केला आहे. ब्राझील हा अधिक किफायतशीर पर्यायांसोबत पुढे आला आहे. आणि युरोपने ब्राझीलमधून इथेनॉल आयात वाढवली आहे. सप्टेंबरच्या मध्यमापासून युरोपमध्ये ब्राझीलच्या इथेनॉलची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. खास करुन जुलै महिन्यातील धोरण बदलानंतर ब्राझीलमध्ये जैव इंधनाच्या किमतीत घसरण झाल्यानंतर खरेदीस सुरुवात झाली आहे.
युरोपमधील मागणी वाढल्याने ब्राझीलमधील कंपन्या पर्यायी प्रकारे इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर ब्राझीलमध्ये बहुतांश उत्पादन उसाच्या रसापासून केले जाते. इथेनॉलला उसाच्या गाळपानंतर उर्वरीत चिपाडापासून बनवले जाऊ शकते. अशा प्रकारे इथेनॉलमध्ये कार्बन उत्सर्जन कमी होते आणि यातून धान्य उत्पादनावर परिणाम होत जात नाही.