बांगलादेशातील वीज संकटामुळे देशांतर्गत साखर पुरवठा निम्म्यावर

ढाका : बांगलादेशातील रिफायनरींमधील ऊर्जा संकटामुळे उत्पादनात व्यत्यय आल्याने देशांतर्गत साखर पुरवठा अलीकडेच जवळपास निम्म्यावर आला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन डॉलरच्या उच्च किंमती आणि उच्च आयात शुल्कामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. स्थानिक रिफायनरी आता बाजारात साधारणतः ४,००० टन साखरेचा पुरवठा करू शकतात. वस्तूतः सामान्य परिस्थितीत हा साखर पुरवठा ८,००० टन केला जातो. गॅस आणि वीज पुरवठ्यातील तुटवड्यामुळे सर्व रिफायनरीजचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रिफायनरींच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, बँकांमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुटवड्यामुळे साखर आयात करणे खूप कठीण झाले आहे. रिफायनर्सनी सरकारकडे साखरेवरील सध्याचे उच्च आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर महिन्याभरापूर्वी ८५-९५ रुपये प्रती किलोवरून ११०-१२० रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here