देशांतर्गत मागणीची पुर्तता करण्यासाठी पुरेसा साखर साठा उपलब्ध : रशिया

मास्को : युक्रेनमध्ये सुरू केलेल्या सैन्य मोहिमेमुळे पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या व्यापक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून वस्तूंची भरपूर खरेदी (Panic Buying) सुरू केली आहे. सरकारने गरजेपेक्षा जादा प्रमाणात वस्तू खरेदी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. देशात स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

रशियाने सांगितले की, अमेरिका आणि सहयोगी देशांनी लावलेले निर्बंध एखाद्या आर्थिक युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत. पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्या अध्यक्षतेखाली एका टीव्ही वाहिनीवरीच चर्चेत बोलताना उप पंतप्रधान व्हिक्टोरीया अब्रामचेंको यांनी साखरेचा साठा करणाऱ्या रशियन नागरिकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, मी लोकांना आश्वासन देतो, की आपण साखर आणि धान्याबाबत पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. अब्रामचेंको यांनी आधीही सांगितले होते की, देशांतर्गत बाजारपेठेत धान्याची कोणतीच कमतरता नाही. रशियाने ३१ ऑगस्टपर्यंत साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. ३३,००,००० टन साखर आणि कच्ची साखर आयातीसाठी शुल्क मुक्त कोटा निश्चित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here