अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह, मिळणार थकीत ऊस बिले

सिद्धार्थनगर : राज्य सरकारने अर्थसंकल्प सादरीकरणात ऊस बिले देण्यात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. शेतकऱ्यांना आपली ऊस थकबाकी लवकरच मिळेल आणि ऊसाचे क्षेत्रही वाढेल याची आशा आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडवले आहेत. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्र घटत आहे. या नकदी पिकाकडून शेतकऱ्यांची निराशा होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळत असल्याचे चित्र होते. मात्र, आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनंतर हे निराशेचे ढग दूर झाले आहेत.

याबाबत दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, डुमरियागंज विभागात दोन कारखाने ऊस खरेदी करतात. यामध्ये बभनान साखर कारखान्याची ऊस बिले गेल्या महिन्यापर्यंत मिळाली आहेत. मात्र, बजाज साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातखरेदी केलेल्या उसापैकी फक्त १२ दिवसांची बिले दिली आहेत. केटवली नानकार ऊस खरेदी केंद्राकडील जवळपास ४० लाख रुपये थकीत आहेत. अठदमातील बजाज शुगर मिलच्या ऊस खरेदी केद्र केटवलीने शेकडो शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिलेले नाहीत. शेतकरी यशवंत चौधरी म्हणाले की आम्ही पाऊण एकरातील ऊस दिला आहे. मात्र, सेंटरवर वजन केल्यावर फक्त १२ दिवसांचे पैसे मिळाले. अद्याप दोन लाख रुपये थकीत आहेत. चैतुराम या शेतकऱ्याने सांगितले की, थकीत पैशामुळे ऊस लागवड क्षेत्र कमी केले आहे. अद्याप एक लाख रुपये मिळालेले नाहीत. शेतकरी रामसंवारे म्हणाले की, कारखाना वेळेवर ऊस बिले देत नसल्याने आम्ही ऊस क्षेत्र घटवून गव्हाची पेरणी केली आहे. उसाचे अद्याप ५० हजार रुपये थकीत आहेत. दरम्यान कारखान्याच्या सीडीओ अंजनी तिवारी यांनी एका महिन्यात शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here