गुजरातमध्ये साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता

अहमदाबाद : गुजरातमध्ये या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मान्सून लांबल्यामुळे तसेच कारखान्यात ऊस गाळपाला उशिर झाल्यामुळे ही घट होऊ शकते.

जाणकारांच्या मते, पाऊस खूप लांबला, त्याचा परिणाम ऊस पिकावर झाला, ज्यामुळे 2019-20 हंगामात राज्यात साखर उत्पादनात 15 ते 20 टककयांपर्यंत घट होऊ शकते.

इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) च्या आकड्यांनुसार 15 डिसेंबर पर्यंत गुजरातमध्ये एकूण 15 कारखाने सुरु होते, त्यामध्ये केवळ 1.52 लाख टन इतकेच साखरेचे उत्पादन होऊ शकले, पण गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पादन जवळपास याच्या दुप्पट (3.10 लाख टन) होते. ISMA च्या अनुसार, राज्यात मान्सून नंतर पावसामुळे ऊस गाळप हंगामाला उशीरा झालेली सुरुवात हे ऊस उत्पादनात होणाऱ्या घटीचे मुख्य कारण आहे.

फेडरेशन ऑफ़ गुजरात स्टेट को ऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज़ (FGSCSF) चे माजी अध्यक्ष मानसिंह पटेल यांच्या मतानुसार, ऊस गाळप ऑक्टोबर मध्ये सुरू होते, पण यंदा नोव्हेंबर मध्ये गाळपाला सुरुवात झाली. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट झाली आहे.

पावसामुळे केवळ गाळप हंगामाला उशीर झाला नाही तर ऊसाच्या पीकावरही परिणाम झाला आहे. FGSCSF चे उपाध्यक्ष, केतनभाई पटेल यांनी सांगितले की, साखरेचे उत्पादन 15-20% कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच 2019-20 च्या हंगामात हे उत्पादन जवळपास 9-9.5 लाख टन होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here