इथेनॉल मिश्रण धोरण साखर उद्योगासाठी फायदेशीर: नाईकनवरे

मुंबई : गेल्या चार-पाच वर्षांपासून साखरेचे अतिरिक्त उत्पादन, जादा साखर साठा, बॅंकांकडून कर्ज मिळविण्यात अडचणी येणाऱ्या साखर कारखान्यांना यंदा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगरचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. यावर्षी साखर उद्योगासमोर नफा मिळवण्याची संधी दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने तयार केलेले इथेनॉल मिश्रण धोरण हे यासाठी कारणीभूत ठरले आहे. हे धोरण तोट्यातील साखर कारखान्यांना फायद्याकडे घेऊन जाण्यास महत्त्वपूर्ण कारण ठरले आहे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने पर्यावरण रक्षणासोबत शेतकऱ्यांच्या जीवनावरही त्याचा चांगला परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

नाईकनवरे म्हणाले, आपण २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे साखर उद्योगाच्या महसुलात वाढ होईल. जर आपण ८.५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठले तर सुमारे २० लाख टन अतिरिक्त साखर साठा कमी होईल. जर इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत पोहोचले तर जवळपास ३५ लाख टन साखर कमी होईल. आणि जेव्हा आपण २० टक्के इथेनॉल संमिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठू तेव्हा, जवळपास ६० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादन करण्यासाठी केला जाईल. अतिरिक्त साखर साठ्याची समस्या सोडविण्यासाठी इथेनॉल मिश्रण धोरण फायदेशीर ठरत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here