नवी दिल्ली : भारताच्या इथेनॉल मिश्रण धोरणामुळे अतिरिक्त साखर साठ्याची समस्या खूप कमी झाली आहे. अतिरिक्त साठा पुढील चार वर्षात एक मिलियन टनापर्यंत कमी होईल अशी शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ५.२ मिलियन टनाच्या उच्च स्तरापासून तो खूप कमी असेल.
द हिंदू बिझनेस लाइनद्वारे आयोजित कमोडिटी मार्केट आऊटलूक २०२२ कार्यक्रमात (Commodities Market Outlook 2022) बोलताना श्री रेणुका शुगर्सचे संचालक रवि गुप्ता यांनी सांगितले की, भारत
ऑक्टोबर २०२३-सप्टेंबर २०२४ या काळात पूर्णपणे निर्यातदार म्हणूनच काम करेल. मात्र, एकूण निर्यातीत ०.५ मिलियन टनाची घसरण होऊ शकते. गुप्ता म्हणाले की, इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण (ऊसाबरोबर) २०२०-२१ च्या २.१ मिलियन टनावरुन वाढून २०२३-२४ मध्ये ५.२ मिलियन टनापर्यंत होण्याची शक्यता आहे.
चालू हंगामाच्या साखरेच्या बॅलन्स शीटबाबत ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या ७.२ मिलियन टनावरुन निर्यात घसरून ६ मिलियन टनावर येथील. तर उत्पादन ३१.२ मिलियन टनावरुन घसरून ३०.५ मिलियन टन होईल. देशांतर्गत खप २६.५ मिलियन टनापर्यंत (२६ मिलियन टन) वाढू शकतो. जागतिक परिस्थितीतवर आपले अनुमान व्यक्त करताना गुप्ता म्हणाले, आयात करणाऱ्या देशांना साखरेसाठी भारताकडेच पाहावे लागेल. कारण जागतिक स्तरावर साखरेची कमतरता आहे. ती पुढेही तशीच राहील. भारतीय निर्यातदारांनी चालू हंगामाच्या सुरुवातीपासूनच ३.३ मिलियन टन साखर पुरवठ्याचे करार केले आहेत.