Ethanol Boost: Narendra Murkumbi म्हणाले की, आगामी १० वर्षे उद्योगांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील पुण्यात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. या परिषदेत साखर उद्योगातील दिग्गजांनी सहभाग घेतला. या उद्योगाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा केली. परिषदेत इथेनॉल विषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.

या परिषदेत रवींद्र एनर्जीचे (Ravindra Energy) कार्यकारी संचालक नरेंद्र मुरकुंबी (Narendra Murkumbi) यांनीही इथेनॉलबाबत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्या सादरीकरणा त्यांनी इथेनॉल किती गरजेचे आहे याची मांडणी केली. या उद्योगातून कसा नफा मिळवला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. ते म्हणाले की, देशात फ्लेक्स इंधनावरील कारचे (Flex fuel car) उत्पादन गरजेचे आहे. ब्राझीलमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपल्याकडे सुरुवातीला ऑटो इंडस्ट्रीने याबाबत रुची दर्शवली नाही. आणि सरकारनेही याला प्रोत्साहन दिले नाही, कारण इथेनॉल उत्पादन कमी होते. सरकारने आता इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. आम्ही २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे धेय्य गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे याचे खूप मोठे मार्केट आहे. त्यामळे लवकरात लवकर इथेनॉल प्लांट स्थापन करावेत असा माझा सल्ला आहे. कारण, आगामी दहा वर्षे ही या उद्योगासाठी सुवर्णसंधी आहे. साखर उद्योगातून वीज आणि इथेनॉलचेही उत्पादन केले जाते. त्यामुळे यास सन्मान मिळेल. त्यामुळे यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी आपल्या भाषणात इथेनॉलसारख्या बहुपर्यायी इधनाच्या वापरावर अधिक भर दिला होता. कृषी आणि निर्मिती उपकरणात इथेनॉलच्या वापराचे प्रयत्न सुरू आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे), साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) आदींच्या सहकार्याने या राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here