इथेनॉलमध्ये गुंतवणूक: उगर शुगर वर्क्स सुरू करणार २०० केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी

केंद्र सरकार इथेनॉल उत्पादनावर भर देत असल्याने अनेक कंपन्याया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. अलिकडेच अनेक साखर कारखाने, कंपन्यांनी डिस्टिलरी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये आता उगर शुगर्सचाही समावेश झाला आहे.

उगर शुगर्सने उगर खुर्दमधील आपल्या प्लांटमध्ये २०० किलो लिटर प्रती दिन क्षमतेची डिस्टिलरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गळीत हंगाात याची चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. कंपनीने विस्तारीकरणासाठी १५१ कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एकूण ११३.१० कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले जाईल. तर कंपनी स्वतःकडील ३७.९० कोटी रुपये यामध्ये गुंतवणार आहे.

सद्यस्थितीत कंपनीची क्षमता ७५ किलो लिटर प्रती दिन आहे. भारतीय शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर्स अप्पर सर्किटवर बंद झाला होता. भारतीय शेअर बाजाराचे नियामक सेबीकडे केलेल्या फायलींगमध्ये भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या धोरणानुसार हे विस्तारीकरण केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here