इथेनॉल स्वस्त आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम : मंत्री नितीन गडकरी

पणजी : इथेनॉल हे केवळ स्वस्त नाही तर पर्यावरणासाठी सर्वोत्तम आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, जीएसटीच्या कक्षेत इंधनाचा समावेश केल्यास किरकोळ किंमत कमी होण्यास मदत होईल. मात्र याचा निर्णय जीएसटी परिषद घेईल.
गोव्यातील उद्योगपतींशी चर्चा करताना गडकरी म्हणाले, इथेनॉल उत्पादनात गतीने वाढ झाल्यास भारत आगामी पाच वर्षांत कच्च्या तेलाची आयात रोखण्यासाठी मदत होईल. गडकरी यांनी इंधन दरवाढीबाबत उद्योगाने व्यक्त केलेल्या चिंतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले, केंद्र सरकारने फ्लेक्स इंजिनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलसोबत इथेनॉलचा वापर करता येईल. बजाज ऑटो, टीव्हीएस आणि टोयाटोसारख्या कंपन्या इंजिन निर्मिती करण्यास तयार झाल्या आहेत. हे इंजिन दोन्ही इंधनावर चालतील, असे गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here