मोलॅसिसच्या तुटवड्यामुळे गोविंद शुगर मिल्सकडून इथेनॉल प्लांट बंद

झुआरी ग्लोबल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची मटेरियल सबसिडरी कंपनी गोविंद शुगर मिल्स मिलिटेडने मोलॅसिसच्या कमतरतेमुळे आपला इथेनॉल प्लांट बंद केला आहे. २० ऑगस्ट २०२१ पासून याची वार्षिक देखभाल दुरुस्ती सुरू करण्याती आल्याचे झुआरी ग्लोबलकडून सांगण्यात आले.

इंडियाइन्फोलाइन डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गोविंद शुगर मिल्स लिमिटेडकडून मोलॅसिसची उपलब्धता करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मोलॅसिस मिळताच प्लांट पुन्हा त्वरीत सुरू केला जाणार आहे. जीएसएमएलकडून इथेनॉल प्लांट पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर कंपनीकडून सेबीला त्वरीत याची माहिती दिली जाईल असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

भारतीय शेअर बाजारात दुपारी झुआरी ग्लोबल लिमिटेडचे शेअर्स बीएसईवर १२३.५० रुपयांच्या आपल्या आधीच्या क्लोजिंगमध्ये ४.९० रुपये अथवा ४ टक्क्यांच्या घसरणीनंतर ११७.६० रुपयांवर ट्रेडिंग करीत होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here