गोविंद शुगर मिल्समध्ये इथेनॉल प्लांट पुन्हा सुरू

गोविंद शुगर मिल्स लिमिटेडने (जीएसएमएल) २० नोव्हेंबर २०२१ पासून आपल्या इथेनॉल प्लांटमध्ये पुन्हा कामकाज सुरू केले आहे. जुआरी ग्लोबल लिमिटेडने रविवारी भारतीय शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली.

जुआरी ग्लोबल लिमिटेडची सहाय्यक कंपनी असलेल्या जीएसएमएलच्या इथेनॉल प्लांटमध्ये मोलॅसीसचा साठा कमी असल्याने कामकाज थांबविण्यात आले होते. त्यानंतर २० ऑगस्टपासून वार्षिक देखभाल, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजता जुआरी ग्लोबल लिमिटेडचा शेअर बीएसईवर ०.४८ टक्क्यांनी वाढून १३६.०० रुपयांवर ट्रेड करीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here