अतिरिकत ऊस आणि तांदुळापासून उत्पादीत इथेनॉलमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल सुधारणा: नितिन गडकरी

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यास मदत होईल. त्यांनी कर्नाटक राज्यातील इथेनॉलच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात आव्हान दिले, कारण कर्नाटक राज्य देशातील ऊसाचे सर्वात मोठ्या उत्पादक राज्यांपैकी एक आहे. त्यांनी सांगितले, देश यापूर्वीच साखर आणि तांदळाचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन अधिक करत आणि सरकारकडे पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. अतिरिक्त उत्पादनाला इथेनॉल मध्ये रुपांतरित केले जाऊ शकते. ज्याचा उपयोग वाहनांसाठी वैकल्पिक इंधनाप्रमाणे केला जाऊ शकतो. यामुळे न केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारेल, तर देशासाठी इंधनाचा एक स्वदेशी स्रोत ही निर्माण होईल.

कर्नाटक मध्ये 33 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनांचे उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात आले. या परियोजनेमध्ये 10,904 करोड़ रुपयांचे 1,197 किलोमीटर लांब पल्ल्याचे रस्ते सामिल आहेत. यावेळी बोलताना, गडकरी यांनी इथेनॉल बाबत आपले विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here