इथेनॉल उत्पादन बंदी : साखरेच्या दरात प्रती क्‍विंटल १० ते ७० रुपयांची घसरण

कोल्हापूर : केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल उत्पादनावर निर्बंध लागू केल्यानंतर साखरेच्या दरात घसरण होण्याची भीती साखर उद्योगातील जाणकारांतून व्यक्त होत होती. झाले ही तसेच अवघ्या आठ दिवसात साखरेच्या दरात घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे  साखर उद्योगाच्या अडचणीत भरच पडली आहे. सध्या साखरेच्या दरात प्रती क्‍विंटल १० ते ७० रुपयांनी घट झाली आहे. अनेक राज्यांमध्ये साखरेचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे. इथेनॉल उत्पादन निर्बंधांचा नकारात्मक परिणाम साखर दरावर होत असल्याने उद्योगाची चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी ३७०० ते ३८०० रुपयापर्यंत असलेले साखरेचे दर आता ३५०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.

यंदा दिवाळीनंतर मागणी कमी झाल्याने साखरेचे दर स्थिरावले होते. देशात किमान ३० लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध होईल असे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जादा साखर उपलब्ध असेल अशा शक्यतेने खरेदी कमी दराने होत आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबरला इथेनॉल उत्पादनावर निर्बंध लादले. तेव्हापासून साखरेच्या दरात रोज १० ते २० रुपयांनी घसरण होत आहे. याचा फटका कारखान्‍यांना बसणार असून यंदाच्या हंगामाची बिले देताना साखर कारखान्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here