देशात २०२०-२१ मध्ये इथेनॉल उत्पादन वाढले

नवी दिल्ली : सरकारकडील आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत देशात इथेनॉलचे उत्पादन वाढून आर्थिक वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १७३ कोटी लिटरवरुन वाढून ३०२ कोटी लिटर झाले आहे. याकालावधीत इथेनॉल मिश्रण जवळपास ६२ टक्क्यांनी वाढले आहे. २०२०-२१ मध्ये इथेनॉल मिश्रण ८.१ टक्क्यांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष २०१९-२० या कालावधीत ५ टक्क्यांवर होते.

देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता सप्टेंबर २०२१ पर्यंत८२५ कोटी लिटर होती. ही उत्पादन क्षमता या वर्षी ३१ मार्चअखेर वाढून ८४९ कोटी लिटर झाली आहे. ही उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यास पुरेशी ठरणारी आहे.

देशात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आणि हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार आणि साखर कारखाने पूर्ण शक्तीनीशी प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here