हैदराबाद : तेलंगणामध्ये आपण इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी कृषी मंत्री आणि शेतकरी नेते शोभनाद्रेश्वर राव यांनी केले. यासोबतच पिक वैविध्यीकरण करून कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे असे राव यांनी सांगितले. शोभनाद्रेश्वर राव यांनी कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषीमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
राव यांनी सरकारच्या कृषी धोरणाचे कौतुक केले आणि सांगितले की, शेतकऱ्यांना ताडाच्या तेलाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आम्ही इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य द्यायला हवे. त्यातून मूल्यवर्धनासह उत्पादनाच्या निर्यातीसाठीच्या सुविधांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला महिला शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ते म्हणाले की, एमएसपीबाबतचा कायदा तयार केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.