प्राज इंडस्ट्रीजच्या नव्या तंत्राने वर्षभर इथेनॉल उत्पादन शक्य

नवी दिल्ली : सरकारच्या २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या उद्दीष्टाच्या पार्श्वभूमीवर प्राज इंडस्ट्रिजच्या नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यातून वर्षभर इथेनॉल उत्पादन करणे शक्य आहे. साखर उत्पादन आणि इन्व्हेंटरी ठेवण्याऐवजी तंत्रज्ञानातून साखर कारखान्यांना आर्थिक व्यवहारांच्या सुधारणेसाठी साखर आणि इथेनॉल उत्पादन यादरम्यान कोणत्याही एकाची निवड करणे शक्य होणार आहे. प्राज इंडस्ट्रीज सोल्यूशनने उसाच्या रसाला एका टिकाऊ फिडस्टॉक बायो सिरपमध्ये रूपांतरित केले आहे. हे बायो सिरप एक वर्षभर टिकू शकते.

प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी साखर उद्योगातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देशातील ऊर्जा क्षेत्रात यातून महत्त्वपूर्ण बदल होमे शक्य आहे. यातून साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अधिक मिळू शकतील. उसाचा रस खराब होत असल्याने तो २४ तासांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. मात्र, उसाच्या रसापासून कंडिशन्ड बायो सिरप मध्ये रुपांतरीत करण्याची प्राज इंडस्ट्रीजचे पेटंट तंत्रज्ञान आहे. त्याची साठवण क्षमता १२ महिन्यांची आहे. साखर कारखाने हंगामात कधीही इथेनॉल उत्पादन करू शकतील. जेव्हा साखरेची गरज असेल तेव्हा साखर उत्पादन आणि इतरवेळी इथेनॉल उत्पादन करता येईल. सध्या साखर कारखाने वर्षातील १४० ते १५० दिवसच सुरू असतात. पारंपरिक पद्धतीने ते हंगामातच इथेनॉल उत्पादन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here