मध्य प्रदेशातही इथेनॉल निर्मितीला मिळणार प्रोत्साहन

92

इंदौर : सरकारने राज्यातील इथेनॉल उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी खास धोरण तयार करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत किमान १८ गुंतवणूकदारांनी राज्यात ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गेल्या सहा महिन्यांत विविध १८ गुंतवणूकदारांनी इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणे निवडली आहेत. इथेनॉल निर्मिती प्लांटसाठी जबलपूर, सतना, छिंदवाडा, विदिशा, बालखघाट, नेमावार आणि धामनोद आदी ठिकाणांचा समावेश यामध्ये आहे.

औद्योगिक धोरण तसेच गुंतवणूक संवर्धन विभागाचे मुख्य सचिव संजयकुमार शुक्ला यांनी सांगितले की आम्ही राज्यात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी आवश्यक जागांचा शोध घेत आहेत ‌ १८ अर्ज मिळाले आहेत. यातून जवळपास ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. शुक्ला यांनी सांगितले की राज्य सरकार लवकरच इथेनॉल धोरण सादर केले जाणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here