इथेनॉलला प्रोत्साहन : शुगर सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी कायम

मुंबई : केंद्र सरकारकडून एथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला (ईबीपी) प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे इथेनॉल आणि साखर उत्पादनात संतुलन राखण्यात यश मिळत आहे. त्याचा चांगला परिणाम साखर कंपन्यांच्या शेअर्सवर (Sugar stocks) दिसून आला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून असलेली या शेअर्समधील तेजी पुढेही सुरू राहील अशी शक्यता आहे.

बलरामपुर शुगर मिल्सचा शेअर गेल्या दोन आठवड्यात २० टक्क्यांनी वाढला. तर ईआयडी पेरी, त्रिवेणी इंजिनीअरिंग, दालमिया भार शुगर आणि धामपूर शुगरच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांची वाढ दिसून आली. द्वारकेश शुगर, अवध शुगर आणि उत्तम शुगर मिल्सच्या शेअर्समध्ये गेल्या दोन आठवड्यात अनुक्रमे ३४ टक्के, ३७ टक्के आणि २७ टक्के वाढ झाली आहे.

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एलकेपी सिक्युरिटीजचे एस. रंगनाथन यांनी सांगतिले की, देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य कर्नाटकही इथेनॉल उत्पादनाच्या केंद्र सरकारच्या मोहिमेत सहभागी होण्यास उत्सुक आहे.

गेल्या हंगामाच्या तुलनेत आता कारखान्यांच्या इथेनॉल महसुलात ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांची बॅलन्स शीट आणि रोखतेच्या प्रवाहात सुधारणेसह इथेनॉलची वाढीव विक्री शेतकऱ्यांना ऊस थकबाकी देण्यास मदत करणारी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here