देशात लवकर सुरू होणार इथेनॉलचे पंप; नितीन गडकरी यांची माहिती

881

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वापराऐवजी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लवकरच इथेनॉलचे पंप सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाला लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. टीव्हीएस मोटर्सच्या नव्या इथेनॉल बाईकच्या लाँच प्रसंगी ते बोलत होते. टीव्हीएस कंपनीने आपाची आरटीआर २०० एफआय ई १०० हे नवे मॉडेल लाँच केले आहे. सध्या या बाईकची किंमत एक लाख २० हजार रुपये असून, ही बाईक महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात उपलब्ध होणार आहे.

टीव्हीएस कंपनीने २०१८ च्या ऑटो एक्स्पोमध्ये या बाईकची घोषणा केली होती. इथेनॉल हे पर्यावरण पूर्वक आणि हातळण्यास तसेच साठवणूक करण्यास सुरक्षित आहे. इथेनॉलमध्ये ३५ टक्के ऑक्सिजन असतो. इथेनॉल जळल्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते. परिणामी कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जनही कमी होण्यास मदत होते. असे असले तरी, देशात आता कोठेही इथेनॉल पंप नाही.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल बाईक बाजारात आणल्याबद्दल टीव्हीएस कंपनीचे कौतुक केले. त्याचवेळी असा प्रयोग थ्री व्हीलरच्या निर्मितीमध्ये करण्याची सूचनाही दिली. गडकरी म्हणाले, इंधन आयातीवर दर वर्षी देशाचे ७ लाख कोटी रुपये खर्च होतात. पण, इथेनॉलसारखे जैव इंधन आपल्याला वाहनांमध्ये आणि अगदी विमानातही वापरता येऊ शकते. देशात सध्या साखर उत्पादन अतिरिक्त झाले आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादन करणे हा उत्तम पर्याय असू शकतो. इथेनॉलची निर्मिती हा आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर, पर्यावरणदृष्ट्याही चांगला पर्याय आहे.

सध्या टू-व्हिलर उद्योग, पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीला प्राधान्य देत आहे. टीव्हीएस कंपनी इथेनॉलवर धावणारी वाहने ही ग्राहकांसाठी महत्त्वाची असल्याचे मानत असल्याचे टीव्हीएस कंपनीचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here