इथेनॉल, सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांना बिहार कॅबिनेटची मंजुरी, दोन हजार जणांना मिळणार रोजगार

पाटणा : राज्याच्या मंत्रिमंडळाने बेगुसराय येथील बरौनी येथे सॉफ्ट ड्रिंक आणि आरा येथे इथेनॉल उत्पादन युनिट सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या दोन्ही औद्योगिक युनिटचे उद्घाटन फेब्रुवारी-मार्च महिन्यात होईल. दोन्ही उद्योगांतून राज्यात २००० पेक्षा अधिक युवकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतील अशी अपेक्षा आहे.

कॅबिनेटने या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर संबंधीत धोरणानुसार अनुदान अथवा प्रोत्साहन रक्कम मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे. राज्यात इथेनॉलचे सर्वात प्रथम उत्पादन युनिट आरा येथे असेल. तेथेच याचे उत्पादन सुरू होईल अशी शक्यता आहे. युनिटच्या अनेक विभागांची निर्मिती झाली आहे. याच महिन्यात याचे उत्पादन सुरू होईल. आरा येथे युनिट सुरू करणारी कंपनी बिहार डिस्टिलरीज अँड बोटलर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून येथे चाऱ्याचेही उत्पादन होणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाने बैठकीत बरौनी येथे ब्रिव्हरेज कंपनीच्या स्थापनेसाठी २७८ कोटी ८५ लाख रुपयंच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तर आरा येथील इथेनॉल युनिटसाठी १६८ कोटी ४२ लाख रुपयांची गुंतवणूक असेल. हा प्लांट आणि मशीनरीसह होणाऱ्या गुंतवणुकीची रक्कम अधिक असेल. त्यावर विविध धोरणांतर्गत प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी दोन्ही कंपन्यांना बिहारच्या औद्योगिक विकासाच्या नव्या युगाची सुरूवात असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here