नव्या सहकारी कारखान्यांमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल

 

 

लखनौ  : चीनी मंडी

उत्तर प्रदेशात इथून पुढे नव्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी तयारी राज्य सरकारने केली आहे. ऊस राज्यमंत्री सुरेश राणा यांनी ही माहिती दिली.

पिपराइच साखर कारखान्यात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले जाईल. इथेनॉलचे एक चांगले मॉडेल उभे रहावे यासाठी सहकारी साखर कारखान्यातून इथेनॉलचे मॉडेल विकसित केले जात आहे. यापुढच्या टप्प्यात जवळपास २४ साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. राज्यात २०१५-१७ मध्ये १८ हजार ००३ कोटी रुपयांची खरेदी झाली होती. त्याची बिले अद्याप देता आलेली नाहीत. आम्ही ३५ हजार ४६३ कोटी रुपयांची ऊस खरेदी केली होती आणि आम्ही समाजवादी पक्षाच्या काळातील ऊस बिलेही भागवत आहोत, असे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात २०१७-१८ मद्ये ३५ हजार ४६३.६८ कोटी रुपयांपैकी ३४ हजार २०२.८२ कोटी रुपयांचे ऊस बिल भागवण्यात आले आहे. यंदाच्या गाळप हंगामात १० हजार ९६९.८६ कोटी रुपयांपैकी ५ हजार २४९.२६ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. त्याचबरोबर जुनी १० हजार ६०५ कोटी रुपयांची थकबाकीही देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही जवळपास ५० हजार ५७.५३ कोटी रुपयांची ऊस बिले भागवली आहेत, असा दावा ऊस मंत्री राणा यांनी केला आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊस बिले पहिल्यांदाच दिल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

राज्यातील १२ साखर कारखान्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राज्यातील ११९ कारखान्यांपैकी ९२ कारखान्यांनी गेल्या हंगामातील बिले दिली आहेत. उर्वरीत कारखान्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. ऊस बिल दिले नाही म्हणून, आजवर पहिल्यांदाच १२ कारखान्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असेही मंत्री राणा यांनी सांगितले. ऊस वजनाच्या बनावट पावत्या बंद करण्यात आल्या. सहकारी समित्यांना अधिकार देण्यात आले. काटा मारल्याप्रकरणी तीन, अवैध ऊस खरेदी प्रकरणी ११ आणि इतर कारणांसाठी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचे माहिती मंत्री राणा यांनी दिली.

डाउनलोड करा  चिनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here