इथियोपिया मध्ये सहा साखर कारखान्यांचे होणार खाजगीकरण

102

इथिओपिया च्या वित्त मंत्रालयाने शुक्रवारी खुलासा केला की, तिथे सहा साखर कारखान्यांच्या खाजगीकरणाचे काम सुरु आहे. इथिओपिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ईबीसी) नुसार, मंत्रालयामध्ये जनसंपर्क प्रमुख हाजी इब्सा यांनी सांगितले की, पुढच्या महिन्यापर्यंत विक्रीला शेवटच्या टप्प्यात नेण्याची योजना आहे. असे सांगून खाजगीकरणात कोणते कारखाने आहेत याबाबत मात्र गुप्तता पाळली.

सरकारलाही हे माहिती नाही की, किती साखर कारखान्यांची विक्री होणार आहे. कारण लिलावासाठी आमंत्रित आंतरराष्ट्रीय बोली लावणार्‍यांना साखर कारखान्याची निवड करावी लागले. हाजी इब्सा यांनी सांगितले की, यामध्ये जे सहभाग घेत आहेत, त्यांनी लिलावाची तारीख पुढे घेण्यास सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here