अदीस अबाबा : अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात फिंचा साखर कारखाना आणि परिसरात जवळपास १४ जण ठार झाले आहेत, असे Ethiopian Sugar Industry Group (ESIG) ने म्हटले आहे. मृतांमध्ये ११ साखर कारखान्यातील कर्मचारी तर तीन विभागातील रहिवासीआहेत. ESIG चे जनसंपर्क विभाग प्रमुख रेटा डेमेके यांनी सांगितले की, हा हल्ला गेल्या शनिवारी, २० मे २०२३ रोजी अदीस अबाबापासून ३५० किलोमीटर अंतरावरील फिंचा साखर कारखान्यावर करण्यात आला होता. रेटा यांनी सांगितले की, गेल्या आणि यंदाच्या आर्थिक वर्षात वारंवार असे हल्ले साखर कारखान्यावर करण्यात आले. मात्र, सध्याच्या हल्ला खूप गंभीर होता. फिंचा साखर कारखान्याची साखर उत्पादन क्षमता २,७०,००० टन आहे. आता हल्ला आणि लुटमारीच्या प्रकारानंतर साखर कारखान्याचे कामकाज बंद करण्यात आले आहे.
रेटा यांच्या म्हणण्यानुसार, ओरोमिया विभागातील होरो-गुडुर वोलेगा झोनमध्ये असलेल्या फिंचा साखर कारखान्याचे एकूण ६७,००० हेक्टर जमिनीत ऊस क्षेत्र आहे. गेल्या हल्ल्यांमध्ये मुख्यत्वे साखर कारखान्याच्या ऊस केद्रांना टार्गेट करण्यात आले होते. त्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी ऊसाची शेते आणि कारखान्यातील मशीनरीला आग लावली होती. मात्र, अलिकडच्या घटनांमध्ये त्यंनी कारखान्यात घुसून मारहाण केली आहे आणि परिस्थिती खूप गंभीर आहे. या नुकसानीचा तपास ईएसआयजीद्वारे स्थापन एका टास्क फोर्सने केला. त्यांनी म्हटले आहे की, कारखान्याचे ११ कर्मचारी आणि शेजारी राहणारे ३ जण ठार झाले आहेत. टास्कफोर्सने आपल्या तपासात कार्यालय, कंप्यूटर, प्रिंटर, आर्तिक कागदपत्रे, मॉनिटरिंग कंप्युटर, कृषी मशीनरी, ट्रॅक्टर आणि ऊस वाहतुकीच्या वॅगन्सची हानी झाली आहे. जनसंपर्क प्रमुख रेटा यांच्या म्हणण्यानुसार, हत्यारे घेवून आलेल्या हल्लेखोरांनी गोदामातील साखरही लुटून नेली.