अदिस अबाबा : जानेवारी २०२३ मध्ये साखरेच्या पुरवठ्यातील तुटवडा भरून काढला जाईल, असे व्यापार आणि विभागीय एकीकरण मंत्रालयाने सांगितले. गेल्या काही महिन्यात राजधानी अदीस अबाबासह लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. मंत्रालयाने सांगितले की, पुरवठ्याची समस्या जानेवारीत सुटणार आहे. कारण, बहुसंख्य कारखान्यांनी उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. डिसेंबरच्या मध्यावर अदिस अबाबा शहरा व्यवस्थापन ट्रेड ब्युरोने शहरातील साखर पुरवठ्यात मोठी कपात झाल्याची कबुली दिली होती.
ब्युरोचे उपप्रमुख मेसिन आसिफा यांनी सांगितले की, साखरेच्या कमतरतेने गेल्या चार महिन्यांत शहरातील पुरवठा खालावला आहे. नियमित १,२०,००० क्विंटल कोट्यापेक्षा हा निम्म्याने कमी आहे. व्यापार आणि विभागीय एकीकरण मंत्रालयातील जनसंपर्क आणि संचार कार्यकारी मनेगर इवने यांनी आपल्याकडील तक्रारींना दुजोरा दिला. मात्र, सांगितले की, शहरात अनुदानीत साखर पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे ही स्थिती निर्माण झाली होती.
व्यापार आणि विभागीय एकीकरण मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पुरवठ्यात कमतरता आहे. सुरक्षेची समस्या, कारखान्यातील यंत्र साहित्याचा तुटवडा आणि परकीय चलनातील तूट यामुळे यात वाढ झाली आहे. परकीय चलनातील कमतरतेमुळे साखरेच्या आयातीवर परिणाम झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी चार साखर कारखान्यांनी पुन्हा एकदा उत्पादन सुरू केले आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इथिओपियामधील सर्वात मोठ्या साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या फिनचा साखर कारखान्याला एका आठवड्यासाठी आपले उत्पादन नाईलाजास्तव बंद करावे लागले होते. कारण, ट्रक चालकांनी सुरक्षेच्या कारणासाठी या भागाचा प्रवास करण्यास नकार दिला होता. मंत्रालयाने दावा केला की, देशांतर्गत उत्पादन वाढी शिवाय, आयात साखरेची खरेदी पूर्ण झाली आहे. जानेवारीपासून १०० टक्के वितरण कोट्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.