युरोपमध्ये २०२१-२२ या हंगामात १४.७ मिलियन टन साखर उत्पादनाची अपेक्षा

न्यूयॉर्क : बिटच्या लागवडीत झालेल्या किरकोळ घसरणीनंतरही २०२१-२२ या हंगामात युरोपीयन युनीयनमध्ये साखरेचे उत्पादन ८,००,००० टनाने वाढून १४.७ मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ पीटर डी. क्लार्क यांनी व्यक्त केली.

अर्थतज्ज्ञ डॉ. क्लर्क यांनी सँटेंडर आयएसओ डाटाग्रो न्यूयॉर्क शुगर आणि इथेनॉल परिषदेच्या दरमान आपला अंदाज व्यक्त केला. युरोपीय युनीयनची साखर आयात घटून १.४५ मिलियन टनावर येईल. तर निर्यात २०२१-२२ या हंगामात ७,००,००० टनापर्यंत घसरेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here