उच्च किमतीमुळे युरोपला जादा साखर आयातीची गरज

लंडन : युरोपला उच्च किमतीमुळे जादा साखर आयातीची गरज आहे आणि अन्न पदार्थ उत्पादकांच्या व्यवसायावर साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे परिणाम होत आहे. कँडी, केक, शीतपेये बनविणाऱ्या कंपन्यांना साखरेसाठी नियमितपेक्षा अधिक दर द्यावा लागत आहे. युरोपियन साखर वापरकर्ते सीआयसूएसच्या म्हणण्यानुसार, साखरेच्या जादा किमतीमुळे त्यांचे नफ्यातील मार्जिन कमी होत आहे. युरोपियन व्यापाऱ्यांनी सांगितले की, युरोपातील काही ठिकाणांवर अन्न निर्माते बाजारातून साखर खरेदीसाठी प्रती टन £१,००० (RM५,५००) पेक्षा अधिक पैसे देत आहेत. नियमित दरापेक्षा हे दर खूप जास्त आहे.

सीआययूएसच्या म्हणण्यानुसार, युरोपियन संघाने (ईयू) तात्पुरते आयात शुल्क उठवावे, तरच प्रक्रिया केलेल्या साखरेचा पुरवठा होवू शकेल. युरोपियन असोसिएशन ऑफ शुगर मॅन्युफॅक्चरर्सनी दावा केली की, अशा पद्धतीच्या उपाय-योजनांमुळे साखरेच्या स्थानिक किमतीवर परिणाम होऊ शकतो. उत्पादकांच्या उत्पन्नाचे यातून नुकसान होऊ शकेल. युरोपियन संघाने उन्हाळा आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याने या हंगामात आपले उत्पादन ७ टक्क्यांनी घसरून १५.५ मिलियन टनापर्यंत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here